Skip to main content
Skip to main content
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

About Us InnerPage Slider

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया

ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया

एनएचएसआरसीएलने आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत श्री चैतन्य सेवा ट्रस्टच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्याच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील गावांंमध्ये दोन आर्थिक वर्षांमध्ये म्हणजेच 2021-22 आणि 2022-23 मध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेसह मोफत नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन केले होते.
या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील सुमारे 22 गावे आणि पालघर जिल्ह्यातील 71 गावे लक्ष्यित करण्यात आली होती.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 1300 हून अधिक वृद्ध रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मोफत नेत्र तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया व्यतिरिक्त रुग्णालय प्रवास, भोजन आणि निवास, औषधे, शस्त्रक्रिया आणि पुढील 30 दिवसांत (ऑपरेशननंतर) फॉलो-अप तपासणी यांसारख्या विविध मदतीचा समावेश आहे.

एनएचएसआरसीएलने आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये योगदान देऊन समाजाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी खंबीर पाठिंबा आणि उत्साह दर्शविला आहे. कंपनीची सर्वोच्च बांधिलकी वंचित लोकांच्या जीवनशैली टिकवून सुधारण्यासाठी आणि मोठ्या स्तरावर समुदायांशी जोडणी साधण्यासाठी आहे.

Weight order
3