Skip to main content
Skip to main content
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

About Us InnerPage Slider

पालघर जिल्ह्यासाठी आधुनिक रुग्णवाहिका तथा मोबाईल हेल्थ युनिट

पालघर जिल्ह्यासाठी आधुनिक रुग्णवाहिका तथा मोबाईल हेल्थ युनिट

पालघर जिल्ह्याच्या डहाणू-तलासरी तालुक्याला वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी एनएचएसआरसीएल द्वारे एक उपक्रम

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरीच्या आदिवासी भागांमध्ये आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी एका उपक्रमात, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड. (एनएचएसआरसीएल), या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या अंमलबजावणी संस्थेने, स्वातंत्र्य दिन 2019 च्या फ्रसंगी, एक पूर्णपणे सज्ज आधुनिक रूग्णवाहिका दान केली. ही रूग्णवाहिका सिविल सर्जन, पालघर यांना डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर यांच्या हस्ते, मा. खासदार राजेंद्र गावित आणि माननीय पालघरचे पालक मंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.

ही रुग्णवाहिका ग्रामीण हेल्थ युनिट पालघर यांना दान केलेली होती, ती एनएचएसआरसीएल द्वारे तिच्या प्राथमिक अवस्थेत स्विकारण्यात आली होती. यानंतर ती आधुनिक वैद्यकीय उपकरणांसह गरजेनुसार आणि अपग्रेड करण्यात आली. स्वतःचे औषधालय असलेल्या, या रूग्णवाहिकेत कार्डियाक आपत्कालीन प्रसंगांसाठी विशेष यंत्रसामग्री असेल. यासोबत, या रुग्णवाहिकेत इमर्जन्सी मेडिकल ट्रॉली, फोल्डींग स्ट्रेचर, फोल्डेबल व्हीलचेअर, पोर्टेबल स्ट्रेचर, ऑक्सीजन सिलिंडर, ब्लड प्रेशर मॉनिटर, IV स्टँड, ब्लड स्टोरेज कंपार्टमेंट, स्पाईन बोर्ड स्ट्रेचर, एयर-कंडीशनर, पेशंट बेड सपोर्ट, एंडोट्रॅकियल ट्युब, रिससायटेशन किट, वॉश बेसिन, डॉक्टर रिवॉल्विंग चेअर, LED बल्ब, स्पॉट लाईट्स आणि बरेच काही आहे. या सुविधांमुळे, रुग्णावरील मूलभूत उपचार तो रुग्णालयाच्या वाटेवर असतानाच सुरु करणे शक्य होईल.

या रुग्णवाहिका-देणगीबाबत समाधान व्यक्त करताना, जिल्हाधिकारी, डॉ. कैलास शिंदे, म्हणाले, “ही पूर्णपणे सुसज्ज आधुनिक रूग्णवाहिका ग्रामीण भागांमधील रुग्णांना मदत पुरविण्यात अतिशय लाभदायक राहील. या उपक्रमामुळे प्रशासनिक स्तरावर आमचे प्रयत्न बळकट होतील.”

डहाणू-तलासरीच्या आदिवासी क्षेत्रांमधील निवासींना या पुढाकाराच अतिशय लाभ होईल.भारताची पहिली बुलेट ट्रेन जिथून जाणार आहे त्या पालघर जिल्ह्यातील एकंदर विकास घडवून आणणे, हे एनएचएसआरसीएल चे प्राथमिक उद्दिष्ट आहे. आगामी दिवसांमध्ये आदिवासी भागांमधील युवकांना रोजगाराच्या अधिक संधी मिळतील याची खात्री करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात येतील.

पालघर, वसई, डहाणू आणि मुंबईतील एनएचएसआरसीएल अधिकारी आणि सरकारी अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

Weight order
4