Skip to main content

एमएएचएसआर सी -3 पॅकेजबद्दल माहिती

Published Date

एनएचएसआरसीएलने मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरसाठी महाराष्ट्र राज्यातील शिळफाटा ते झरोली दरम्यान ठाणे, विरार आणि बोईसर या तीन एचएसआर स्थानकांसह 135 किमी च्या वायडक्ट, पूल आणि माउंटन बोगद्यांच्या डिझाइन आणि बांधकामासाठी निविदा मागविल्या आहेत. 508 किमी लांबीच्या एमएएचएसआर कॉरिडॉरच्या बांधकामासाठी ही अंतिम निविदा आहे. (पॅकेज क्र. एमएएचएसआर-सी-3)

या निविदेमध्ये नद्यांवरील ११ पूल आणि ६ पर्वतीय बोगद्यांसह ३६ पुलांचा समावेश असलेल्या १३५ किमी च्या वायडक्टच्या बांधकामाचा समावेश आहे.

निविदा सादर करण्याची शेवटची तारीख : 14 मार्च 2023

बोली उघडण्याची तारीख: 15 मार्च 2023

508 किलोमीटरचा एमएएचएसआर मार्ग महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये आणि दादरा आणि नगर हवेली या एका केंद्रशासित प्रदेशात येतो. महाराष्ट्रातील १५६ किलोमीटर लांबीच्या एमएएचएसआर कॉरिडॉरसाठी गेल्या पाच महिन्यांत नागरी कामांची ही तिसरी आणि शेवटची निविदा आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) भूमिगत एचएसआर स्टेशनच्या बांधकामासाठी या वर्षाच्या सुरुवातीला 22 जुलै 2022 रोजी निविदा मागविण्यात आल्या होत्या आणि 4 नोव्हेंबर 2022 रोजी तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या होत्या, ज्या अंतिम टप्प्यात आहेत.

बीकेसी एचएसआर स्टेशन ते शिळफाटा दरम्यान समुद्राखालील 7 किमी बोगद्यासह 21 किमी (अंदाजे) भूमिगत बोगद्याच्या बांधकामासाठी निविदा 23 सप्टेंबर 2022 रोजी मागविण्यात आल्या होत्या आणि 20 जानेवारी 2023 रोजी उघडल्या जाणार आहेत.

गुजरात आणि दादरा आणि नगर हवेलीतील 8 एचएसआर स्टेशन आणि एक साबरमती एचएसआर डेपोसह 352 किमी अलाइनमेंटसाठी सर्व सिव्हिल आणि ट्रॅक निविदा यापूर्वीच अंतिम झाल्या आहेत आणि काम प्रगतीपथावर आहे.