Skip to main content

मीडिया ब्रीफ: एमएएचएसआर कॉरिडॉरचे १०० किलोमीटरचे पियर चे काम पूर्ण झाल्याबद्दल

Published Date

एमएएचएसआर कॉरिडॉरचे १०० किलोमीटर चे पियर चे काम पूर्ण

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरने गुजरात राज्यात (३५२ किमी) १०० किमी पियर चे काम करण्याचा मैलाचा दगड गाठला आहे.

इतर तपशील खालीलप्रमाणे आहेत:

  1. गुजरात राज्यातील प्रकल्प अपडेट
    • १०० कि.मी.च्या पट्ट्यात पिअर बांधण्यात आले आहेत
    • या पुलाचा पाया १९३ किमी लांबीचा ठेवण्यात आला आहे
    • 9.2 किमीचे व्हायाडक्ट पूर्ण झाले असून त्यात नवसारीजवळ 2.5 किमी अखंड व्हायाडक्ट आणि विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या 6.7 किमीचा समावेश आहे.
    • गर्डर कास्टिंग - २२.७ किमी गर्डर टाकण्यात आले असून ९.२ किमी गर्डर उभारण्यात आले आहेत.
    • गुजरातमधील ८ जिल्हे आणि दादरा आणि नगर हवेली मधून जाणाऱ्या अलाइनमेंटसह बांधकाम जोरात सुरू झाले आहे.
    • वापी ते साबरमती या ८ एचएसआर स्थानकांचे काम बांधकामाच्या विविध टप्प्यात आहे.
    • नर्मदा, ताप्ती, माही आणि साबरमती या महत्त्वाच्या नद्यांवर पुलांचे काम प्रगतीपथावर आहे.
  2. भूसंपादनाची स्थिती :
    • एकूण:- 97.82%
    • गुजरात:- 98.87%
    • दादरा आणि नगर हवेली:- 100%
    • महाराष्ट्र:- 95.45%

महाराष्ट्रातील जमिनीच्या ताब्याची स्थिती ७३.८३ टक्के

Related Files