Skip to main content

मीडिया ब्रीफ : मुंबई बुलेट ट्रेन स्टेशनचे बांधकाम अपडेट

Published Date

महत्वाच्या तारखा आणि आकडे

  • करारावर स्वाक्षरी करण्याची तारीख: 20 मार्च 2023
  • एकूण जमीन : 4.8 हेक्टर
  • स्थानकाची खोली: 32 मीटर (10 मजली इमारतीच्या समतुल्य)
  • 100% सेकेंट पायलिंग पूर्ण झाले म्हणजे 3382 सेकेंट पायल्स, प्रत्येकी 17 ते 21 मीटर पर्यंतचे
  • बांधकाम स्थळाची लांबी: बोगद्यासाठी शाफ्ट क्षेत्रासह 1 किमी (अंदाजे)
  • अद्याप झालेले खोदकाम : 18 लाख घनमीटरपैकी 2 लाख घनमीटर
  • या ठिकाणाहून मटेरियल डम्पिंग एरियापर्यंत दररोज 400 ते 500 ट्रकफेऱ्या होतात
  • 774 कामगार सध्या साइटवर काम करत आहेत

बीकेसी स्थानकाच्या उभारणीसाठी लागणारी सुमारे 4.8 हेक्टर जमीन एनएचएसआरसीएलने (नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड) कंत्राटदाराला दिली आहे.

बॉटम-अप पद्धतीचा वापर करून हे स्थानक बांधण्यात येणार आहे, म्हणजेच जमिनीपासून खोदकाम सुरू होईल आणि पायापासून काँक्रिटचे काम सुरू होईल. स्टेशनसाठी लागणारे खोदकाम खूप व्यापक आहे, जे 32 मीटर (सामान्य निवासी इमारतीचे सुमारे 10 मजले) खोलीपर्यंत पोहोचते व अंदाजे 18 लाख घनमीटर आहे.

अशा प्रकारचे खोल खोदकाम सुरक्षितपणे करण्यासाठी माती कोसळू नये यासाठी ग्राऊंड सपोर्ट सिस्टीम उभारणे गरजेचे आहे. या सपोर्ट सिस्टीममध्ये 17 ते 21 मीटर खोलीच्या 3382 सेकेंट पायल्स तयार करण्यात येणार आहेत. सर्व सेकेंट पायल्स बांधण्यात आले आहेत.

स्थानक परिसरात खोदकाम सुरू झाले असून, सुमारे 2.0 लाख क्यूम माती आधीच खोदकाम करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. खोदकाम जसजसे पुढे जात आहे तसतसे विशिष्ट अंतराने (2.5 ते 3.5 मीटरपर्यंत) मातीच्या अँकर आणि वॉलर्सचा आधार घेतला जात आहे. डंपरच्या 400 ते 450 फेऱ्यांच्या संख्येच्या दृष्टीने खोदकामाचा आवश्यक दर दररोज सुमारे 6000 क्युम आहे. मुंबईच्या मध्यभागी हा आकडा गाठणे हे मोठे आव्हान आहे.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या व्यावसायिक जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी वसलेले आणि उच्चभ्रू निवासी संकुले आणि कार्यालयीन इमारतींनी वेढलेले हे बांधकाम स्थळ असल्याने व्यावसायिक जिल्ह्यातील रहिवासी, कार्यालयीन कर्मचारी आणि वाहतुकीची फारशी गैरसोय न होता बांधकामाची कामे पुढे जातील याची काळजी घेणे एनएचएसआरसीएलसाठी अधिक महत्वाचे ठरते. मुंबईतील वाहन प्रवेश निर्बंध, स्फोट निर्बंध, धूळ नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना लक्षात घेऊन हे सर्व सुनिश्चित केले जाते.

खोदलेल्या क्षेत्रामध्ये समर्थन प्रणालीच्या (मातीचे अँकर आणि वॉलर्स) परिणामकारकतेसाठी उच्च-स्तरीय उपकरणांचा व्यापक वापर सुनिश्चित केला जातो. इन्क्लिनोमीटर, पिझोमीटर, थ्रीडी टार्गेट, लोड सेल इत्यादी उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

मुंबई मेट्रो लाइन 2 बी, एससीएलआर फ्लायओव्हर अशा परिसरातील इतर पायाभूत सुविधांच्या कामांनी हे बांधकाम वेढलेले आहे. मेट्रो 2 बी, एससीएलआर उड्डाणपुलाच्या अलाइनमेंटशी जवळीक लक्षात घेता महत्त्वाच्या पॅरामीटरची देखरेखही नियमितपणे केली जात आहे.

सद्यस्थितीत 774 मजूर व पर्यवेक्षक अहोरात्र कार्यरत आहेत. जागेच्या आवश्यकतेनुसार पुढील नियोजन केले जाईल. या ठिकाणी सुरू असलेले प्राथमिक काम म्हणजे खोदकाम करणे आणि मातीचे अँकर व वॉलर बसवणे.

Related Images