वडोदरा बुलेट ट्रेन स्टेशनचे बांधकाम भारतीय रेल्वेच्या वडोदरा रेल्वे स्टेशनजवळ, पंड्या ब्रिजजवळ केले जात आहे. प्रवाशांना भारतीय रेल्वे आणि बुलेट ट्रेनदरम्यान अखंड आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळावी या उद्देशाने हे स्टेशन भारतीय रेल्वेच्या सध्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ च्या वर बांधले जात आहे. या एकत्रीकरणामुळे प्रवाशांना दोन्ही सेवांमध्ये सहजपणे बदल (इंटरचेंज) करण्याची सुविधा उपलब्ध होईल.
स्टेशनचे सध्याचे स्थान पश्चिम रेल्वे स्टेशन तसेच शहर आणि आंतरराज्यीय बस डेपोसोबत उत्तम मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी प्रदान करते.
स्टेशनची रचना शहरात आढळणाऱ्या वडाच्या (वट) झाडाच्या आकारावरून आणि पानांवरून प्रेरित आहे. स्टेशनच्या अंतर्गत भागांचे नियोजन अशा प्रकारे करण्यात आले आहे की, प्रवासी क्षेत्रांमध्ये पुरेशा प्रमाणात नैसर्गिक प्रकाश उपलब्ध होईल आणि बाहेरील आकाशाचे दृश्यही दिसेल.
प्रवाशांची सोय आणि आराम लक्षात घेऊन स्टेशनवर प्रतीक्षा कक्ष, शिशु काळजी कक्ष (बेबी केअर), विश्रामगृह (रेस्ट रूम), किरकोळ विक्रीची दुकाने (रिटेल आउटलेट्स) यांसह अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. याशिवाय, कार, बस आणि ऑटो यांसारख्या विविध वाहतूक साधनांसाठी स्वतंत्र पार्किंग क्षेत्र तसेच पिक-अप आणि ड्रॉप-ऑफ बे ची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.
स्टेशनची सद्यस्थिती आणि प्रगती
स्टेशनच्या कॉन्कोर्स, ट्रॅक आणि प्लॅटफॉर्म स्तरावर स्लॅब कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. सध्या स्ट्रक्चरल स्टील इरेक्शनचे (लोखंडी सांगाडा उभारणीचे) काम वेगाने सुरू आहे.

