Skip to main content

मीडिया संक्षिप्त : बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी (एमएएचएसआर कॉरिडॉर) विद्युतीकरणाच्या कामासाठी कंत्राटी करारावर स्वाक्षरी

Published Date

मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल (एमएएचएसआर) प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील प्रगतीच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, एनएचएसआरसीएलने एमडी / एनएचएसआरसीएल, एनएचएसआरसीएलचे संचालक, वरिष्ठ अधिकारी आणि एमएलआयटी जपान (भूमी मंत्रालय, इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रान्सपोर्ट अँड टुरिझम) जीआयसीए (जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी), जपानी दूतावास आणि जपान एचएसआर इलेक्ट्रिक इंजिनीअरिंग कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईडब्ल्यू-1 पॅकेज अंतर्गत इलेक्ट्रिकल कामे करण्यासाठी मेसर्स सोजिट्झ अँड एल अँड टी कन्सोर्टियमशी करारावर स्वाक्षरी केली आहे.

कंत्राटी करारावर स्वाक्षरी केल्याने जपानी शिंकानसेन तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन ऑपरेशनसाठी वाढीव सहकार्याचा एक बेंचमार्क स्थापित झाला आहे.

ईडब्ल्यू-1 कामांमध्ये जपानी शिंकानसेन सिस्टम-आधारित ट्रॅक्शन पॉवर पुरवठ्याचा समावेश असलेल्या 320 किमी / तासापर्यंतच्या वेगासाठी उपयुक्त 2 बाय 25 केव्ही विद्युतीकरण प्रणालींचे डिझाइन, उत्पादन, पुरवठा, बांधकाम, स्थापना, चाचणी आणि कमिशनिंग समाविष्ट आहे.

त्यामध्ये ट्रॅक्शन सबस्टेशन (टीएसएस) – संख्या 14 , सेक्शनिंग पोस्ट (एसपी)- संख्या 11, सब-सेक्शनिंग पोस्ट (एसएसपी)- संख्या 19, आणि ऑटो ट्रान्सफॉर्मर पोस्ट (एटीपी)- संख्या 1, ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई): मेनलाइन: 508 मार्ग किमी, डबल लाइन आणि 3 डेपो: सुरत, साबरमती आणि ठाणे, 11 केव्ही बॅकबोन सह विस्तृत वितरण प्रणाली आणि 125 पेक्षा जास्त उपकेंद्रे आणि संबंधित नागरी उपयोगिता इमारती, सुमारे 508 किलोमीटरच्या संपूर्ण एमएएचएसआर कॉरिडॉरसाठी प्रशिक्षण संस्था उपकरणे इ.

Related Images