Skip to main content

विवेक कुमार गुप्ता यांनी एनएचएसआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला

Published Date

आज आयआरएसई 1988 च्या बॅचचे अधिकारी विवेक कुमार गुप्ता यांनी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प राबविणारी संस्था) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. एनएचएसआरसीएलमध्ये रुजू होण्यापूर्वी गुप्ता यांनी रेल्वे बोर्ड (रेल्वे मंत्रालय) येथे प्रधान कार्यकारी संचालक / गति-शक्ती म्हणून काम केले. नागरी (बांधकाम, प्रकल्प देखरेख आणि स्टेशन डेव्हलपमेंट), इलेक्ट्रिकल (आरई), सिग्नल आणि दूरसंचार, रहदारी, वित्त, नियोजन आणि आर्थिक संचालनालय या सात (07) विभागांच्या एकात्मिक कामकाजासाठी ते जबाबदार होते, जे पंतप्रधान गति-शक्ती कार्यक्रमाच्या थीमचे अनुसरण करून भारतीय रेल्वेच्या स्टेशन विकासासह सर्व प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक एकत्रित टीम म्हणून कार्यरत होते.

मध्य आणि पश्चिम रेल्वेमध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम), मुख्य ट्रॅक अभियंता, मुख्य पूल अभियंता आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) अशी विविध वरिष्ठ पदे त्यांनी भूषविली आहेत. या भूमिकांमध्ये, नवीन मार्गांचे बांधकाम, गेज रूपांतरण, दुहेरीकरण / मल्टी ट्रॅकिंग, रहदारी सुविधेची कामे, ट्रॅक बांधकामाची कामे आणि रेल्वे पुलांची देखभाल यासह बांधकाम प्रकल्पांची जबाबदारी त्यांच्यावर होती.

मुंबई रेल विकास महामंडळात (एमआरव्हीसी) मुख्य अभियंता असताना त्यांनी एमयूटीपी I/एमयूटीपी-II आणि एमयूटीपी-III साठी प्रकल्प समन्वयात महत्त्वाची भूमिका बजावली. ज्याची एकूण किंमत सुमारे रु. 20,000 कोटी याव्यतिरिक्त, त्यांनी सुमारे रु. 34,000 खर्चाच्या एमयूटीपी 3A प्रकल्पाच्या तयारीच्या कामाचे नेतृत्व केले. एमआरव्हीसीमधील सर्व नागरी अभियांत्रिकी पैलूंचा समन्वय आणि जागतिक बँक, एआयआयबी, एमएमआरडीए, सिडको आणि मंत्रिगटासह विविध संस्थांशी संवाद साधणे, नियोजन आणि अंमलबजावणीशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे ही त्यांची जबाबदारी होती.

एप्रिल 2019 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत डीआरएम/भुसावळ हे पद भूषवत त्यांनी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. सुरक्षा, कार्यक्षमता, पायाभूत सुविधांची कामे, महसुली खर्च नियंत्रण आणि कर्मचारी कल्याण ही त्यांची कर्तव्ये होती.

Related Images