Skip to main content

एमएएचएसआर सी -1 पॅकेजबद्दल माहिती

Published Date

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरसाठी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) एचएसआर स्टेशनच्या डिझाइन आणि बांधकामासाठी एनएचएसआरसीएलने आर्थिक निविदा उघडल्या

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ने एमएएचएसआर सी -1 पॅकेज अंतर्गत मुंबई (महाराष्ट्र) मधील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) हायस्पीड रेल्वे स्टेशनच्या डिझाइन आणि बांधकामासाठी आर्थिक निविदा उघडल्या आहेत.

तांत्रिकदृष्ट्या पात्र असलेल्या तीन (तीन) निविदाकारांच्या आर्थिक निविदा आज उघडण्यात आल्या असून मेसर्स मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड जॉइंट व्हेंचर (मेसर्स एमईआयएल-एचसीसी जॉइंट व्हेंचर) यांनी सर्वात कमी बोली लावली आहे.

या निविदेसाठी तांत्रिक बोली 4 नोव्हेंबर 2022 रोजी उघडण्यात आली.