Skip to main content
Skip to main content
Mar

NATIONAL HIGH SPEED RAIL CORPORATION LIMITED

नेशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

myth-vs-fact-banners1

मीडिया ब्रीफ: मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे ब्रेकथ्रू पूर्ण

Published Date

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे ब्रेकथ्रू पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील अंबेसरी गावाजवळ यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे.

हा बोगदा ४१७ मीटर लांब आणि १४.४ मीटर रुंद असून, बुलेट ट्रेन मार्गिकेवरील अप आणि डाऊन या दोन्ही ट्रॅकसाठी त्याची रचना करण्यात आली आहे.

बोगद्याचे उत्खनन दोन्ही टोकांवरून नियंत्रित ड्रिलिंग आणि ब्लास्टिंग पद्धतीने करण्यात आले. उत्खननादरम्यान संरचनेची स्थिरता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक मॉनिटरिंग प्रणाली आणि भू-तांत्रिक उपकरणांचा वापर करण्यात आला.

उत्खननाच्या कामावेळी कंपन, बोगद्याचे वर्तन आणि परिसरातील संरचनांवर होणारा परिणाम यावर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी सरफेस सेटलमेंट पॉइंट्स (SSP), 3D टार्गेट्स, स्ट्रेन गेजेस आणि सिस्मोग्राफ्स यांसारख्या रिअल-टाइम मॉनिटरिंग प्रणाली बसवण्यात आल्या होत्या.

बोगद्यामधील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी योग्य वायुवीजन व्यवस्था, अग्निसुरक्षा उपाययोजना, नियंत्रित प्रवेश व्यवस्था आणि सातत्यपूर्ण भू-तांत्रिक निरीक्षण यावर विशेष भर देण्यात आला.

गुजरात आणि महाराष्ट्रातील पर्वतीय बोगद्यांची (MT) सद्यस्थिती

प्रकल्पातील एकूण आठ (०८) पर्वतीय बोगद्यांपैकी सात (०७) बोगदे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात असून एक (०१) बोगदा गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात आहे.

  • MT-08 (३५० मीटर) चे ब्रेकथ्रू ५ ऑक्टोबर २०२३ रोजी पूर्ण झाले.
  • MT-07 (४१७ मीटर) चे ब्रेकथ्रू १ जून २०२६ रोजी पूर्ण झाले.
  • MT-06 (४५४ मीटर) चे ब्रेकथ्रू ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पूर्ण झाले.
  • MT-05 (१.५ किमी) चे ब्रेकथ्रू २ जानेवारी २०२६ रोजी पूर्ण झाले.
  • MT-04 मध्ये जवळपास ६०% प्रगती झाली आहे.
  • MT-03 मध्ये उत्खननाचे ८०% पेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे.
  • MT-02 आणि MT-01 चे कामही वेगाने सुरू आहे.

ठळक बाबी

  • या पर्वतीय बोगद्याचे उत्खनन पूर्ण झाल्यामुळे गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रात तीन पर्वतीय बोगद्यांचे उत्खनन पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील सर्वाधिक गुंतागुंतीच्या विभागांपैकी एका विभागात ही अतिशय वेगवान प्रगती मानली जात आहे.
  • वापी आणि बोईसर बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यानचे सर्व तीन पर्वतीय बोगदे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहेत. मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिका महाराष्ट्रातील बोईसर आणि गुजरातमधील वापी या महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यातून जाते. या दोन्ही शहरांदरम्यानच्या मार्गावर तीन (०३) पर्वतीय बोगदे (MT-08, MT-07 आणि MT-06) असून त्यांचे उत्खनन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. बांधकामाची कामे या संपूर्ण विभागात वेगाने प्रगती करत आहेत.
Related Images