मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला. मुंबई (महाराष्ट्र) येथील विक्रोळी येथे टनेल बोरिंग मशीन (TBM) चा पहिला कटरहेड यशस्वीरित्या शाफ्टमध्ये उतरविण्यात आला. 13.6 मीटर व्यास आणि सुमारे 350 टन वजन असलेला हा कटरहेड TBM च्या मुख्य शिल्डच्या प्राथमिक असेंब्लीच्या अंतिम टप्प्याचे प्रतीक आहे।
21 किलोमीटर लांबीच्या मुंबई बोगदा विभागापैकी 16 किलोमीटर भागाच्या बांधकामासाठी दोन TBM मशीनची असेंब्ली केली जात आहे. यात ठाणे खाडीखाली बांधण्यात येणाऱ्या 7 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचाही समावेश आहे, जो भारतातील पहिला समुद्राखालील रेल्वे बोगदा असेल. प्रत्येक TBM चे वजन 3,000 टनांपेक्षा अधिक असून, रेल्वे बोगदा बांधकामासाठी देशात आजपर्यंत वापरण्यात आलेल्या या सर्वात मोठ्या मशीन आहेत।
अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना:
- 13.6 मीटर व्यास असलेला हा कटरहेड इतक्या मोठ्या बोगद्याचे खोदकाम करू शकतो की ज्यामध्ये हाय-स्पीड कॉरिडॉरच्या अप आणि डाउन दोन्ही लाईन्स एकाच बोगद्यात असतील
- त्याचे 350 टन वजन अंदाजे 250 प्रवासी कार (मिड-साईज SUV) च्या वजनाइतके आहे
- हे युनिट पाच स्वतंत्र शिपमेंटद्वारे साइटवर आणण्यात आले असून, त्यांना 1,600 किलोग्रॅम उच्च-प्रेसिजन वेल्डिंगद्वारे जोडण्यात आले
- या युनिटमध्ये 84 कटर डिस्क, 124 स्क्रेपर्स आणि 16 बकेट लिप बसविण्यात आले आहेत, जे उत्खनन आणि मलबा हटविण्याची प्रक्रिया प्रभावी बनवतात।
कटर डिस्क हे मुख्य उपकरण असून ते खडक कापण्याचे कार्य करतात. त्यानंतर कटरहेडवरील स्क्रेपर्स मलबा हटविणे आणि साफसफाईचे कार्य करतात।
बकेट लिप हा कटरहेडमधील खुला भाग आहे, ज्याद्वारे मलबा मशीनच्या मक्क चेंबर (muck chamber) मध्ये प्रवेश करतो. हे मलबा गोळा करण्यास आणि पाइपलाइन प्रणालीकडे मार्गदर्शित करण्यास मदत करते, ज्यामुळे बोगद्याबाहेर त्याची विल्हेवाट लावणे शक्य होते।
ही TBM विक्रोळीपासून सुमारे 6 किलोमीटरचा प्रवास करून दाट नागरी परिसर आणि मिठी नदीखालून जात बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील बांधकामाधीन मुंबई बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत पोहोचेल, जिथे तिला बाहेर काढण्यात येईल।
बोगदा खोदकाम सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी तसेच आसपासच्या संरचनांवर सतत लक्ष ठेवण्यासाठी विविध मॉनिटरिंग उपकरणांचा वापर केला जात आहे. यामध्ये सरफेस सेटलमेंट पॉइंट्स (SSP), ऑप्टिकल डिस्प्लेसमेंट सेन्सर्स (ODS) किंवा टिल्ट मीटर्स, BRT (बाय रिफ्लेक्ट टार्गेट/3D टार्गेट), बोगद्याच्या पृष्ठभागावरील सूक्ष्म ताण (micro strains) मोजण्यासाठी स्ट्रेन गेज, तसेच पीक पार्टिकल व्हेलॉसिटी (PPV) किंवा कंपन आणि भूकंपीय लहरींचे निरीक्षण करण्यासाठी सिस्मोग्राफ यांचा समावेश आहे।

